Categories
Community Work Data Collection

ओडीके कलेक्ट ॲप साठी सेटींग

दुर्गम ठिकाणांहून सर्वे डेटा कसा गोळा करायचा?

दुर्गम ठिकाणांहून त्वरित आणि सोयीस्करपणे डेटा गोळा करण्याची आमची पद्धत काय आहे?

 • ही एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत आहे
 • आपण संगणक नाही तर स्मार्ट फोन वापरू शकतो
 • आपण आपल्या इच्छेनुसार स्मार्ट फोनद्वारे इंग्रजी किंवा मराठीमध्ये वाचू आणि लिहू शकतो
 • हे ऑनलाइन आणि ऑफलाइनचे खूप चांगले संयोजन आहे, जसे कोविड काळात होते
 • फोटो, ऑडिओ, व्हिडीओ, लोकेशन, मजकूर, नंबर आम्हाला हवा तसा डेटा पाठवू शकतो
 • आपल्याला जास्त टाईप करावे लागत नाही, बरेच प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात
 • सर्वात चांगला भाग म्हणजे ते विनामूल्य आहे
 • या पद्धतीला ओपन डेटा किट किंवा ओडीके म्हणतात

यासाठी आम्हाला आमच्या फोनवर ODK Collect नावाचा सॉफ्टवेअर सेट करावा लागेल

डेटा संकलन प्रकल्पाचा एक भाग म्हणून सर्वे फॉर्म ठरवले जातात आणि सिस्टम प्रशासकाद्वारे परिभाषित केले जातात आणि इंटरनेटवरील सर्व्हरवर संग्रहित केले जातात.

आमची प्रक्रिया आहे

 • इंटरनेटवरून ODK COLLECT सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट फोनवर इन्स्टॉल करा
 • ODK COLLECT सॉफ्टवेअर तुमच्या स्मार्ट फोनवर सेट करा
 • इंटरनेटवरून सर्वे फॉर्म आणि त्याच्याशी संबंधित डेटा डाउनलोड करा. सिस्टम अॅडमिनने आधीच सर्वे फॉर्म निश्चित केले आहेत आणि ते इंटरनेट सर्व्हरवर ठेवले आहेत.

फक्त ही तीन कामे इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणाहून करणे आवश्यक आहे.

 • एकदा सर्वे फॉर्म तुमच्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड झाला की, तो तुमच्या स्मार्ट फोनवर कोणत्याही डेटा कनेक्टिव्हिटी शिवाय किंवा मोबाईल ऑपरेटर कनेक्टिव्हिटी शिवाय भरला जाऊ शकतो. शेवटी तुमचा स्मार्ट फोन देखील एक स्मार्ट संगणक आहे
 • भरलेला फॉर्म तुमच्या फोनवर साठवला जातो.
 • आवश्यक असल्यास सर्वेफॉर्मचे पुनरावलोकन करण्याची आणि पुनरावलोकनासह किंवा त्याशिवाय अंतिम रूप देण्याची संधी तुम्हाला मिळते
 • मग एकदा तुम्ही फॉर्म फायनल केला आणि पाठवायला तयार झाला की तुम्ही तुमच्या घरी
 • किंवा डेटा कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी परत आल्यावर तो सर्वेक्षण डेटा सर्व्हरला पाठवू शकता.
 • ऑनलाइन आणि ऑफलाइन काम करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि विनामूल्य आहे !!

चला तर मग, आता आपण ODK Collect सॉफ्टवेअर डाउनलोड, इन्स्टॉल आणि सेटअप आणि कसे वापरायचे ते शिकू या

सेट-अप

ह्या पोस्टमधे ODK Collect अँप पटकन कसे सेट-अप करायचे ते सांगितले आहे.

 • वापरकर्त्याकडे मोबाइल डेटा किंवा वायफाय कनेक्शनसह Android आधारित स्मार्टफोन असावा. डेटा /वायफाय कनेक्शन त्याच्या घरातून किंवा किमान एका तरी ठिकाणी कार्यरत असणे गरजेचे आहे. आयफोन वापरकर्ते – क्षमस्व. ODK Collect आयफोनसाठी उपलब्ध नाही.
 • वापरकर्त्याने त्याचा Google ईमेल आयडी तयार करणे आवश्यक आहे आणि ई-मेल सक्रिय असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक अँड्रॉईड मोबाईल वापरकर्त्याचा गुगल ई-मेल बनवलेला असतो आणि वापरात सुद्धा असतो.

ओडीके कलेक्ट अ‍ॅप सेट-अप करताना आपल्या मोबाइल फोनवर डेटा कनेक्टिव्हिटी सुरू केलेली असणे आवश्यक आहे.
आपल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवर जा, ओडीके कलेक्ट नावाचे अ‍ॅप शोधा, अ‍ॅप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
जेव्हा ओडीके कलेक्ट अ‍ॅप सुरू होईल तेव्हा खालील प्रमाणे मुख्य पेज/स्क्रीन दिसेल .

मुख्य पेजवर /home screen वर उजवीकडील वरच्या कोपऱ्यात गोलाकार ठिकाणी दिसणाऱ्या अक्षराला (D किंवा तत्सम अक्षर असेल जसे की D for Demo , S for Sample इत्यादी) टच करा, तसे केल्यावर एक पॉप अप खालीलप्रमाणे दिसेल.

त्यामध्ये सेटींग्ज /settings बटन टच करा.

सेटिंग्ज चे पेज /स्क्रीन खालीलप्रमाणे दिसेल .

त्यातील Server हा पर्याय टच करा.

त्यात खालीलप्रमाणे पेज /स्क्रीन दिसेल .

यामधे Type = ODK आधीपासूनच असायला हवे, नसल्यास तेथे टच करून सेट करा.

URL मधे आपल्याला देण्यात आलेली लिंक किंवा URL (उदाहरणार्थ https://www.pbodas.in/odk.php किंवा https://www.pbodas.in/odkv2.php असे) सेट करायचे आहे. ज्या कुणी व्यक्ती किंवा संस्थेने आपल्याला सर्व्हे भरण्यासाठी सांगितले असेल त्यांनीच योग्य ती लिंक/URL दिली असणार, ती इथे अचूक – जशीच्या तशी भरावी.

वरील चित्रामधे दिसणारी लिंक केवळ उदाहरण म्हणून दाखवलेली आहे ह्याची नोंद घ्यावी.

ODK Collect नव्याने इंस्टॉल केल्यावर तेथे काही अन्य सेटींग असेल ते टच करून इथे दिल्याप्रमाणे भरून घ्या.

User Name आणि Password रीकामे सोडा.

यानंतर मोबाईलच्या back बटन चा वापर करून Settings च्या पेज/स्क्रीन वर जा आणि User and device identity हा पर्याय टच करा. तसे केल्यावर खालीलप्रमाणे पेज/स्क्रीन दिसू लागेल.

यामधे दिसणाऱ्या Form Metadata येथे टच करा, तसे केल्यावर खालील पेज/स्क्रीन दिसू लागेल.

या पेज/स्क्रीनमधे User Name, Phone Number, Email address ह्या तीनही बाबत आपला योग्य तो तपशील भरावा.

User Name येथे आपले नाव लिहू शकता, परंतु ई-मेल आय-डी लिहिणे सोयीस्कर ठरेल.

Phone Number आपला स्वतःचा मोबाइल फोन नंबर भरावा.

Email address कृपया आपला स्वतःचा वैध ई-मेल आय-डी भरावा. अन्य कुणाचा/परिचिताचा /कुटुंबामधील सदस्याचा ई-मेल आय-डी नको.

ही माहीती भरणे आवश्यक आणि अनिवार्य आहे.

ही माहीती ना भरल्यास किंवा चुकीची भरल्यास आपल्या फोनद्वारे गोळा करावयाची सर्व्हेक्षणाची माहीती ग्राह्य धरली जाणार नाही.

येथे भरलेली माहीती एकदाच भरायची आहे आणि पुढे कधीही बदलू नये.

Device ID मधे जे काही आपोआप भरलेले दिसत असेल ते तसेच राहू दे.

आता आपले सेटींग करून पूर्ण झाले आहे.

उपलब्ध सर्व्हे

सेटींग झाल्यानंतर आता आपण आपल्याला दिलेले सर्व्हेक्षण /सर्व्हे निवडायचे आहेत.

त्यासाठी ODK Collect च्या मुख्य पेज/स्क्रीनवरील Get Blank Form हे बटण टच करा.

तसे करताच Server कडून उपलब्ध असलेले सर्व्हे आणून खालीलप्रमाणे दाखवले जातील.

उपलब्ध सर्व्हे असे यादीस्वरूपात पाहायला मिळतील.

त्यातील आपल्याला सांगण्यात आलेला एक किंवा अनेक सर्व्हे निवडा आणि Get Selected बटण टच करा.

ही स्टेप पूर्ण होण्यासाठी थोडा/काही सेकंदांचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर वरीलप्रमाणे मेसेज दिसेल आणि सर्व्हे चा फॉर्म आपल्यासाठी उपलब्ध होईल.

मुख्य पेजवरील Fill Blank Form हे बटण टच केले की आपल्याला माहीती नोंदवून सर्व्हे भरण्यासाठी आवश्यक तो फॉर्म निवडता येईल.

ह्या सर्व प्रक्रीयेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास संबंधितांशी व्हाट्सअँप /फोनद्वारे संपर्क साधावा.